-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे घेतली तर सध्याच्या घडीला दीपिका पहिल्या क्रमांकावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
-
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या दीपिकाने आता बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलंय.
-
पहिल्या चित्रपटापासूनच दीपिकाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.
-
'ओम शांती ओम' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या दीपिकाने आज अफाट यश, संपत्ती मिळवली आहे.
-
उत्तम अभिनय आणि चित्रपटांमुळे बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पदुकोण कायम चर्चेत असते.
-
दीपिका कुठेही गेली तर तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असतात. अशावेळी तिच्या सुरक्षेची जबाबदारी ज्याच्यावर असते तो म्हणजे तिचा बॉडीगार्ड जलाल.
-
जलालचा जन्म महाराष्ट्रात झाला असून इथेच तो लहानाचा मोठा झाला.
-
गेल्या अनेक वर्षांपासून जलाल दीपिकासोबत काम करत आहे.
-
आपली सुरक्षा करत असल्याने दीपिका जलालला आपला भाऊ मानते. इतकंच नाही तर राखीदेखील बांधते.
-
दीपिका कुठे प्रवास करत असो अथवा कुठे कार्यक्रमाला जाणार असो… जलाल तिथे नेहमी उपस्थित असतो.
-
दीपिका आणि रणवीरचं इटलीत लग्न झालं तेव्हाही जलाल तिथे उपस्थित होता.
-
आपल्या या मानलेल्या भावाला दीपिका किती पगार देते हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोणच्या बॉडीगार्डची वर्षाची सॅलरी जवळपास १.२ कोटी असल्याचे म्हटले जाते.
-
दीपिकाच्या अनेक सेल्फींमध्येही जलाल दिसत असतो.
-
आता दीपिकाचा बॉडीगार्डदेखील सेलिब्रिटींपेक्षा कमी राहिलेला नाही.
-
कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही कपिल शर्माने जलालला स्टेजवर बोलावून त्याच्याशी गप्पा मारल्या होत्या.
-
जलालला आता सोशल मीडियावरदेखील ओळख मिळाल्याचे समजते. दीपिका पदुकोण फॅन क्लबचे मेंबर्स आता जलाललादेखील फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत.
-
दरम्यान दीपिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास लवरकरच ती रणवीर सिंगसोबत ८३ चित्रपटात दिसणार आहे.
-
कबीर खानने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
-
रणवीर सिंग चित्रपटात कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका ऑनस्क्रीनवरही रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”