-
‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ यांसारख्या अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर.
‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. -
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत मितालीने लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपे वाडा येथे २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नसोहळा पार पडला.
-
या दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल नेटवर्किंगवर फारच चर्चेत होते.
-
तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न केलं.
-
तसे मिथाली आणि सिध्दार्थ हे दोघे सोशल नेटवर्किंगमुळे कायमच चर्चेत असतात.
-
अनेकदा सिद्धार्थ मिथालीचे फोटो सोशल नेटवर्कींगवरुन शेअर करताना दिसतो.
-
मिथालीही स्वत:चे बरेच फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत आपल्या चाहत्यांच्या टचमध्ये असते.
-
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मितालीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून या फोटोंबरोबरच त्यांच्या कॅप्शनहीची जोरदार चर्चा आहे.
-
तशी मिथाली अनेकदा वेगवेगळ्या साड्यांमधील आपले फोटो पोस्ट कर असते. मात्र नुकतेच तिने पोस्ट केलेल्या फोटोंना दिलेल्या कॅप्शनही फारच सुंदर आहेत.
-
मिथालीने पोस्ट केलेले हे फोटो तिचा पती आणि अभिनेता सिद्धार्थनेच काढलेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये ती काय म्हणतेय पाहूयात.
-
"तू भी अँखियों से कभी मेरी अँखियो की सुन.."; अशी कॅप्शन मिथालीने या फोटोला दिलीय.
" Verified You are saying the words that I want you to say" अशा कॅप्शनसहीत मिथालीने हा फोटो शेअर केलाय. -
या फोटोला तर तिने बंगालीमध्ये कॅप्शन दिली असून या कॅप्शनचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाल्यास, आज मी तुझ्या मनाला स्पर्श केलाय असा होतो.
-
मिथालीने पोस्ट केलेल्या या फोटोंना हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळालेत. (सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर / इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी