-
'मन उडू उडू झालं' हि मालिका झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली.
-
या मालिकेच्या प्रोमोजपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता खूप होती.
-
या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.
-
अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आहे.
-
तसंच तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या मालिकेतील लूकवर प्रेक्षक आणि चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत.
-
हृता या मालिकेत दीपिका देशपांडेची भूमिका निभावतेय.
-
दीपिका हि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असून ती आपल्या बाबांच्या तत्वांना धरून आयुष्यात पुढे जातेय.
-
पण इंद्रा तिच्या आयुष्यात आल्यानंतर पुढे काय होणार हे पाहाणं औस्त्युक्याचं ठरेल.
-
मालिकेत दीपिकाचा लुक अत्यंत साधा पण तितकाच मोहक आहे.
-
साधेपणातच सुदंरता असते याचा प्रत्यय दीपिकाकडे पाहून येतो.
-
इतकंच नव्हे तर दीपिका आणि इंद्राची जोडी देखील प्रेक्षकांना अत्यंत भावली आहे.
-
सोशल मीडियावरून या दोघांसाठी चाहते आपलं प्रेम फोटो आणि व्हिडीओच्या रूपात व्यक्त करताना दिसत आहेत.
-
प्रेक्षकांचं अफाट प्रेम पाहून हृता आणि अजिंक्य देखील भारावून गेले आहेत.
-
आपल्या सोशल मीडियावरून हृता आणि अजिंक्यने मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या भरगोस प्रतिसादासाठी त्यांचे आभार मानले आहेत.
-
दीपिका आणि इंद्राची हि जोडी पाहण्यासाठी बघायला विसरू नका 'मन उडू उडू झालं' सोमवर ते शनिवार रात्री ७.३० वाजता झी मराठीवर.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली