-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल सगळीकडे लागली आहे…‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी बाप्पाचे आगमन होणार आहे.
-
राजा रानीची गं’ जोडी मालिकेमध्ये देखील गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात होणार आहे.
-
रणजीत घरच्या बाप्पाची स्थापना करणार आहे. घरच्यांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे.
-
ढालेपाटीलांच्या घरात बाप्पाचं थाटामाटात आगमन तर होणार आहे पण या प्रसंगी सगळ्यांना संजूची कमतरता नक्कीच भासणार आहे.
-
संजूवर आता घराची आणि कामाची अशी दुहेरी जबादारी आहे, जी ती उत्तमरीत्या पार पाडत आहे. यावेळेसचा गणेशोत्सव संजूसाठी थोडा वेगळा असणार आहे.
-
संजू बाप्पाची आरती ऑनलाइन करणार आहे. पोलिसांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन होते पण, त्यांना गणरायाच्या आगमनासाठी सज्ज राहावं लागतं आणि सगळे सुखरूप आपल्या घरी पोहचावेत ही त्यांची जबाबदारी असते आणि आता हीच जबाबदारी संजीवनी मालिकेत पार पाडताना दिसणारा आहे.
-
संजू एकीकडे तिचं कर्तव्य बजावरणार आहे.
-
अनेक मुली,लग्न झालेल्या स्त्रिया त्यांची नोकरी सांभाळून घराच्या जबाबदार्या अगदी चोखपणे पार पडताना आपल्याला दिसतात मला त्या सगळ्या स्त्रिया, मुलींचा अभिमान आणि कौतुक आहे. आणि मी नशीबवान आहे मला अशी भूमिका करण्याची संधी मिळाली असं ती म्हणतेय.
-
राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये ढालेपाटीलांच्या घरामध्ये बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे.
-
पुढील काही दिवस या मालिकेत गणेशोत्सवाता उत्साह पाहायला मिळेल.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’