-
छोट्या पडद्यावरील तुफान लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’.
-
कमी कालावधीत ही मालिका तुफान लोकप्रिय झाली असून या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले आहे.
-
सध्या ही मालिका चांगल्याच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.
-
अलिकडेच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा गाठला आहे.
-
या मालिकेत अनिरुद्ध देशमुखचा भाऊ आणि अरुंधती देशमुखचा धाकटा दीर अविनाश देशमुख कोण, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्याच्याविषयी बऱ्याचदा बोलले जायचे. त्याचा स्वभाव, त्याच्या चुका यावर मालिकेतून वारंवार भाष्य झाले आहे; परंतु कधीही हे पात्र समोर आले नव्हते. काही वर्षांपूर्वी कौटुंबिक वादातून त्याने घर सोडल्याचा दाखलाही आला आहे; पण अखेर अविनाश देशमुख कोण, ही उत्कंठा सरली आहे.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता शंतनु मोघे या मालिकेत अनिरुद्धचा लहान भाऊ ‘अविनाश’ ही भूमिका साकारत आहे.
-
अभिनेता शंतनू मोघे विवाहित आहे. २४ एप्रिल २०२१ रोजी शंतनूने प्रिया मराठेशी लग्नगाठ बांधली.
-
शंतनू प्रमाणेच प्रिया मराठे ही एक उत्तम अभिनेत्री आहे.
-
‘या सुखांनो या’ मालिकेतून प्रियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
-
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे प्रियाचे अनेक चाहते आहेत.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील गोदावरीची भूमिका, ‘पवित्र रिश्ता’मधील वर्षा, ‘तू तिथे मी’ या मालिकेतील खलनायक भूमिका या तिच्या काही भूमिका गाजल्या आहेत.
-
विशेष म्हणजे केवळ मराठीच नाही तर प्रियाने हिंदी मालिकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.
-
सध्या प्रिया, झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही जोडी नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शंतनु मोघे, प्रिया मराठे / इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL