अभिनेत्री विद्या बालन हिने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. -
विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य मिळवलं आहे.
उत्तम अभिनय आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर विद्याने कलाविश्वात स्वत:च अढळ स्थान निर्माण केलं आहे. मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी विद्या आज कलाविश्वातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विद्या बालनने नुकतंच एक हटके फोटोशूट केलं आहे. -
यात विद्याने राखाडी रंगाची खादीची साडी परिधान केली आहे.
-
हे फोटोशूट करतेवेळी ती घराच्या एका कोपऱ्यात बसलेली दिसत आहे.
या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत आहे. -
मात्र घराच्या एका कोपऱ्यात फोटो काढल्यामुळे ती ट्रोल होत आहे.
-
तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.
-
“तू खूप जाड झालीस, जास्त बटाटे खाऊ नकोस”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने तिच्या फोटोवर केली आहे.
-
तर एका नेटकऱ्याने तू कोपऱ्यात का बसलीस? असा प्रश्न विचारला आहे.
विद्या बालनच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. -
मात्र यामुळे ती ट्रोलही होत आहे.
-
(सर्व फोटो – विद्या बालन/ इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल