-
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव आहे.
-
दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती.
-
या पहिल्यावहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते.
-
पण अचानक एका घटनेनंतर महिमाचे संपूर्ण आयुष्य बदलले.
-
त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्याचे पाहायला मिळाले.
-
आता एका मुलाखतीमध्ये तिने फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.
-
‘मला असे वाटते आता फिल्म इंडस्ट्री रुळावर आली आहे. आता अभिनेत्रींना योग्य भूमिका आणि चित्रपटात योग्य सीन्स दिले जात आहेत. अभिनेत्रींना कामाचे योग्य पैसे मिळत आहेत. त्यांच्याकडे पहिल्या पेक्षा जास्त चांगल्या ऑफर्स आहेत’ असे महिमा म्हणाली.
-
पुढे ती म्हणाली, ‘पूर्वीच्या काळात अभिनेत्रींच्या रिलेशनचा कामावर परिणाम व्हायचा. तुम्ही कुणाला तरी डेट करताय हे कळताच त्याबाबत चर्चा सुरु व्हायच्या. अनेकदा त्या बद्दल लिहिले जायचे. कारण आधी व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच भूमिका दिल्या जात होत्या. ज्यांनी आजवर किस केलेले नाही. तुमच्या रिलेशनविषयी त्यांना कळाले की ते लगेच त्याविषयी चर्चा करणार. तुमचे लग्न झाले असेल तर तुमचे करिअर संपलेच समजा.’
-
पण आता अनेक गोष्टी बदलत असल्याचे महिमाने सांगितले आहे.
-
आजकाल तुम्ही कुणाला डेट करता याचा तुमच्या कामावर परिणाम होत नाही असं ही महिमा म्हणाली आहे.
-
प्रोफेशनल लाइफ आणि प्रायवेट लाइफ दोन्ही वेगळे ठेवण्याचा प्रयत्न सर्वजण करत असल्याचे महिमाने सांगितले.
-
महिमा २०१० नंतर ती चित्रपटांमध्ये फारशी झळकलीच नाही.
-
करिअरच्या सुरुवातीलाच तिचा भीषण अपघात झाला होता. या अपघाताचा परिणाम पुढे तिच्या करिअरवरही झाला.
-
एका मुलाखतीमध्ये तिने, ‘बेंगळुरूमध्ये स्टुडिओला जाताना माझ्या कारचा भीषण अपघात झाला होता. एका ट्रकने कारला धडक दिली होती. या अपघातातून मी मरता मरता वाचले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी जेव्हा आरशात पाहिलं, तेव्हा धक्काच बसला. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून ६७ काचांचे तुकडे काढले होते’ असे सांगितले होते.
-
(PHOTO CREDIT : INSTAGRAM)

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान