-
चित्रपटांची भव्यता ही प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे येण्यास भाग पाडते. आताच्या घडीला केवळ बिग बजेट चित्रपटांची निर्मिती होत असून भव्यतेला अधिक प्राधान्य दिले जाते. महागड्या गाड्या, कपडे, दागिने यांचा यात समावेश होतो. पण, एकदा का चित्रपट येऊन गेला की या सर्व गोष्टींच काय होत असेल याचा कधी विचार केला का? बड्या कलाकार मंडळींनी चित्रपटांमध्ये घातलेले कपडे, दागिने यांचा नंतर लिलाव केला जातो. आपण विचारही करू शकत नाही अशा किंमतींना या गोष्टी विकल्या जातात. (आणखी वाचा : चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचे नंतर काय केले जाते? जाणून घ्या)
-
‘जवानी फिर ना आए’ हे सलमानचे गाणे आजही तितकेच प्रसिद्ध आहे. त्यात त्याने केलेला टॉवेल डान्स विसरणं तर अशक्यच आहे.
-
तुम्हाला कदाचित ऐकून धक्का बसेल पण हे टॉवेल चक्क एक लाख ४२ हजार रुपयांना विकले गेले होते.
-
माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या भूमिका असलेला ‘बेटा’ चित्रपट बराच हिट झालेला. यातील एका गाण्यात माधुरीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. ही साडी अनेकांना आवडली होती.
-
पण, चॅरिटीचा विचार करता ही साडी केवळ ८० हजार रुपयांना विकली गेली.
-
शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘देवदास’ चित्रपट तर सर्वांच्याच लक्षात असेल. यातील ‘मार डाला..’ या गाण्यात माधुरीने हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला होता. हा लेहेंगा तब्बल तीन कोटी रुपयांना विकला गेलेला.
-
अभिनेत्री प्रियांका चोप्राने युनिसेफच्या ‘सेव्ह द गर्ल कॅम्पेन’ वेळी गुलाबी रंगाची सॅण्डल घातली होती. ती सॅण्डल जवळपास अडीच लाख रुपयांना लिलावात विकण्यात आलेली.
-
‘उमराव जान’ चित्रपटात फारुख शेख यांनी एक खड्याची अंगठी घातली होती. ही अंगठी लिलावात ९६ हजार रुपयांना विकण्यात आलेली.
-
‘चाहे कोई मुझे जंगली कहे’ गाण्यात शम्मी कपूर यांनी घातलेले जॅकेट त्यावेळी ८८ हजार रुपयांना विकले गेले होते.
-
‘लगान’ चित्रपटात आमिर खानने वापरलेली बॅट तब्बल एक लाख ५६ हजार रुपयांना विकली गेलेली.
Mohan Bhagwat : “ब्राह्मण, मुस्लिम किंवा ख्रिश्चन कुणालाही संघात स्थान नाही, फक्त..”; मोहन भागवत असं का म्हणाले?