-
मराठी चित्रपटसृष्टीमधील सध्याची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.
-
हृता सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
हृताने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.
-
फोटोमध्ये दिसणारा मुलगा आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
हृता टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शाहला डेट करत आहे.
-
तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रतीक सोबतचा फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये ते रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
-
हृताच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रिया बापटने कमेंट करत ‘जलवा’ असे म्हटले आहे. तर रसिका सुनीलनने अभिनंदन असे म्हटले आहे.
-
सध्या हृताच्या या पोस्टवर कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
प्रतीकने काही हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
-
त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी मालिकांसाठी काम केले आहे.
-
आता हृता लग्नबंधनात कधी अडकणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल