-
गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका म्हणून ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेला ओळखले जाते.
-
या मालिकेच्या पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच तिसऱ्याही पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
-
सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे.
-
दोन भागांची सांगड घालून मालिकेत अनेक रहस्य उलगडली जात आहेत.
-
लवकरच या मालिकेत वच्छी परत येणार आहे.
-
नुकतंच झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर वच्छीचे म्हणजे अभिनेत्री संजीवनी पाटील हिचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
यात वच्छीचा नवा लूक पाहायला मिळत आहे.
-
या फोटोत वच्छीही माईंप्रमाणेच म्हातारी झालेली दिसत आहे. तिच्या हातात काठी, डोक्यावर पांढरा टिळा आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या दिसत आहेत.
-
तिचे पांढरे झालेले केस, पांढऱ्या रंगाची साडी हा लूक पाहून प्रेक्षकही फार भारावले आहेत. अनेकजण तिच्या या नव्या लूकचं कौतुक करताना दिसत आहे.
-
वाड्याचा जिला हव्यास होता ती वच्छी नेमकं काय करणार? खरंच माईच्या पाठीशी उभी राहणार का? शोभा, काशीच्या मृत्यूचा सूड घेणार का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर सध्या उपस्थित केली जात आहे.
-
त्यामुळे मालिकेच्या आगामी भागातच प्रेक्षकांना वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मिळेल.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा