-    बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या कायम चर्चा रंगलेल्या असतात. पण काही बॉलिवूड कलाकार असे देखील आहेत ज्यांनी भांडणे विसरुन एक्स गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडच्या लग्नाला हजेरी लावली. या यादीमध्ये कोणते कलाकार आहेत हे जाणून घेऊया… 
-    अभिनेता रणबीर कपूर आणि सोनम कपूर हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘सांवरिया’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. 
-    सोनमच्या लग्नात रणबीर कपूर आलिया भट्टसोबत गेला होता. 
-    अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगने चित्रपटसृष्टीतील करिअरला एकत्र सुरुवात केली होती. ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. 
-    जेव्हा अनुष्काने क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न केले तेव्हा रिसेप्शनला रणवीर सिंगने हजेरी लावली होती. 
-    बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूरचे रिलेशन जगजाहिर होते. पण काही दिवसांनंतर त्यांचा ब्रेकअप झाला. 
-    जेव्हा प्रियांकाने हॉलिवूड गायक निक जोनसशी लग्न केले तेव्हा शाहिदला लग्नाचे आमंत्रण दिले होते. तसेच शाहिदने देखील प्रियांकाचे रिसेप्शन अटेंड केले होते. 
-    डीनो मोरिया आणि बिपाशा बासू एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. 
-    बिपाशाने करण सिंह ग्रोवरशी लग्न केले तेव्हा डीनोने हजेरी लावली होती. 
-    मिलिंद सोमण दीपानिताला डेट करत होता. 
-    जेव्हा मिलिंद सोमणने अंकिता कोणवारशी लग्न केल तेव्हा दीपानिता देखील हजर होती. 
-    नेहा धुपिया आणि युवराज सिंहच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. 
-    नेहा धुपियाच्या लग्नात युवराजने मजामस्ती केली होती. 
 
  ‘हा भारत नाही’, सिडनीत दिवाळी साजरी केल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिलेनं व्यक्त केला संताप; म्हणाली, “दुसऱ्या देशात येऊन…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
  