-
जेव्हा कोणत्या बॉलिवूड कलाकाराला आपण कार्यक्रमात नाचताना पाहतो. तेव्हा आपल्याला ही असं वाटतं की आपल्या घरातल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली पाहिजे आणि त्यासोबत डान्स केला पाहिजे. तर तुम्ही कधी विचार करत असाल की हे कलाकार कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावायला आणि डान्स करायला किती मानधन घेत असतील. तर कोणता कलाकार कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी किती मानधन घेतो हे आज आपण या गॅलरीत जाणून घेणार आहोत.
-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियाकां कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये घेते.
-
बॉलिवूडचा मोस्ट हॅन्डसम अभिनेता म्हणून हृतिक रोशन ओळखला जातो. रिपोर्टनुसार कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी हृतिक २ कोटी ५० लाख रुपये मानधन म्हणून घेतो.
-
वर्षात सगळ्यात जास्त चित्रपट करणार अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी जवळपास २ कोटी ५० लाख रुपये घेतो.
-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर एका कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी २ कोटी रुपये मानधन म्हणून घेतो.
-
बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणचे लाखो चाहते आहेत. दीपिका कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी १ कोटी रुपये घेते.
-
बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच रणवीर सिंग एका कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी १ कोटी रुपये मानधन म्हणून घेतो.
-
कतरिना तिच्या अभिनयासोबतच तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. रिपोर्टनुसार, कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी कतरिना ३ कोटी ५० लाख रुपये मानधन म्हणून घेते.
-
शाहरुख खान – बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला कोणी लग्नात बोलावणार नाही. पण मीडिया रिपोर्ट्स नुसार शाहरुख एका कार्यक्रमात जाण्यासाठी जवळपास ३ कोटी रुपये मानधन म्हणून घेतो.
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तर सलमान कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी जवळपास २ कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. (All Photo Credit : File Photo )

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या कानशिलात लगावणाऱ्या आरोपीचं नाव व फोटो समोर, हल्ल्याचं कारणही सांगितलं