-
अभिनेत्री सुवरीन चावला नेहमीच चित्रपटसृष्टीत चालणाऱ्या कास्टिंग काऊचबाबात बेधडकपणे बोलताना दिसते.
-
मागच्याच वर्षी एका मुलाखतीत सुवरीननं तिला अनेकदा आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवांवर भाष्य केलं होतं.
-
‘एका निर्मात्यानं क्लिवेज आणि मांड्या दाखवण्याची मागणी केली होती’ असा धक्कादायक खुलासा तिने या मुलाखतीत केला होता.
-
त्यानंतर अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सुवरीननं दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीबाबतही काही खळबळजनक खुलासे केले आहेत.
-
‘माझे वजन, कंबर आणि ब्रेस्ट साइझवरुन विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे मला विचित्र अनुभव येऊ लागले. या अनुभवांमुळे मला स्वतःच्या योग्यतेवरही शंका येऊ लागली होती’ असं आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना सुवरीन म्हणाली.
-
अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर सुवरीनला कशाप्रकारे वजन, कंबर आणि ब्रेस्ट साइझवरून प्रश्न करण्यात आले याचा अनुभव तिने सांगितला.
-
‘कोणत्याही महिलेच्या शरीराची साइझ तिची योग्यता ठरवू शकत नाहीत’ असं आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुवरीननं सांगितलं.
-
महिलांना पारखण्यासाठी या योग्य गोष्टी नाहीत असंही या मुलाखतीत सुवरीन म्हणाली.
-
सुवरीन चावला मागची काही वर्ष तणावग्रस्त आयुष्य जगत होती. पण आता यातून बाहेर पडली असल्याचंही तिनं सांगितलं.
-
सुवरीन म्हणाली, ‘पूर्वी अशा गोष्टींबाबत उघडपणे बोललं जात नव्हतं. पण आता वेळेनुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत.’
-
सुवरीन पुढे म्हणाली, ‘आता लोक उघडपणे कास्टिंग काऊच, बॉडी शेमिंग, मानसिक आरोग्य किंवा आयुष्यातील नकारांबद्दल बोलताना दिसत आहेत.’
-
सुवरीन चावला लवकरच आर माधवनसोबत ‘Decoupled’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे
-
हार्दिक मेहताचं दिग्दर्शन असेलेली ही वेब सीरिज येत्या १७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”