-
बॉलिवूडमध्ये सर्वच अभिनेत्री त्यांच्या फॅशन आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. मात्र या सर्वांना मलायका अरोरा नेहमीच मागे टाकताना दिसते.
-
वयाच्या ४८ व्या वर्षी कमालीचा फिटनेस असलेल्या मलायकाचे काही बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.
-
मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती सिल्व्हर रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
-
ख्रिसमसच्या अगोदर मलायकानं शेअर केलेले शिमरी लुकमधील हे फोटो सध्या इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
सिल्व्हर रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मलायकानं मिरर फोटोशूट केलं आहे. ज्यातील तिच्या अदांवर चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
मलायकाचं फोटोशूट नेहमीपेक्षा खूपच वेगळं आणि युनिक असल्यानंच तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
-
मलायकाच्या या फोटोंवर युजर्सच्या लाइक्स आणि कमेंट्स अक्षरशः पाऊस पडताना दिसतो आहे.
-
मलायकाच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील कलाकार तसेच तिची बहीण अमृता अरोरानंही तिच्या या फोटोंवर कमेंट केली आहे.
-
मलायका सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ या शोसाठी परिक्षक म्हणून काम पाहत आहे.
-
याशिवाय अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे मलायका सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. (सर्व फोटो- मलायका अरोरा इन्स्टाग्राम)

Sharad Pawar : “…तो प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, शरद पवारांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले