-
मीडियावर सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. यामुळे ते बऱ्याचवेळा ट्रोल होताना दिसतात. तर अनेक वेळा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सेलिब्रिटी ट्रोल होतात. यावर अनेकदा सेलिब्रिटी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतात. यंदाच्या वर्षी कोणते कोणते सेलिब्रिटी कोणत्या कोणत्या कारणामुळे ट्रोल झाले चला जाणून घेऊया…
-
वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला होता. वॉशिंग्टन डीसी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. यावेळी त्याने “मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आमचा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्यांवर धावून जातो,” असे व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये म्हटले होते.
-
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा ट्रोल झाल्यानंतर शिल्पाची बहिण शमिता शेट्टीही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती. राजला अटक झाल्यानंतर शमिताने शिल्पाला पाठिंबा देत पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते.
-
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचवेळा मलायका अर्जुन कपूरसोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. त्या दोघांमध्ये असलेल्या वयाच्या फरकामुळे ते नेहमी ट्रोल होताना दिसतात.
-
ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर जेष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या ट्रोलच्या शिकार झाल्या होत्या. खरतर जया बच्चन यांनी लोकसभेत भोजपुरी स्टार रवी किशनवर निशाणा साधताना बॉलीवूडशी निगडित काही लोक अपना पेट भरने के लिए थाली में छेद करते हैं। असं वक्तव्यं केलं होतं असे वक्तव्य केले होते.
-
‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या कपड्यांमुळे नेहमीच ट्रोल होताना दिसते.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही रणबीर कपूरसोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रणबीरने आलियाचा सगळ्यांसमोर अपमान केला होता. तो कधीच तिचा मान राखत नाही तरी ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे म्हणून तिला बऱ्याच वेळा ट्रोल करण्यात आलं आहे.
-
बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्माता करण जोहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर करण जोहर ट्रोल होताना दिसतो.
-
यंदाच्या वर्षी करण त्याने परिधान केलेल्या एका कोटमुळे ट्रोल करण्यात आला आहे. करणने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जो कोट परिधान केला होता, त्यावर प्राण्यांच्या चित्राचा लोगो होता. त्यानंतर ट्रोलर्सनी या डिझाईनची पाकिस्तानी एजन्सी (ISI) लोगोसोबत तुलना करण्यास सुरुवात केली.
-
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखचा मुलगा आर्यन खान यंदाच्या वर्षी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत राहिला आहे. या प्रकरणात त्याल्या अटक करण्यात आली होती. या बातमीनंतर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.
-
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आर्यन खानच्या बाजूने समोर आले होते, तर आर्यनला ड्रग्ज प्रकरणाबाबत सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी प्रचंड ट्रोल केले. त्यामुळे शाहरुख खानही ट्रोलच्या निशाण्यावर आला.
-
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. हृतिक रोशनशी तिचा असलेला पंगा किंवा मग घराणेशाहीवर असलेलं तिचं वक्त कंगना नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने राजकारणवर देखील वक्तव्य केलं होतं.
-
कंगना म्हणाली होती की १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर भीक मिळाली होती. यानंतर कंगनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा २०२१ मध्ये पॉर्न व्हिडीओ प्रकरणामुळे चर्चेत आला होता. पॉर्न प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
-
यानंतर राज कुंद्रा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला, तर शिल्पा शेट्टीही ट्रोलच्या निशाण्यावर आली. (All Photo Credit : File Photo)

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार