-
‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखलं जाते. गेली अनेक वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
श्रेया सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने एक पोस्टही लिहिली आहे.
-
श्रेयाने हे फोटो पोस्ट करत ती लवकरच एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याचे तिने सांगितले आहे.
-
श्रेयाने नुकतंच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘एका नवीन मंचावर…., एका नवीन भूमिकेत…, एक नवीन प्रयत्न…’, असे कॅप्शन तिने दिले आहे.
-
“तुम्ही सगळ्यांनी आजवर मला भरभरून प्रेम दिलंय, आज मी एका नवीन भूमिकेत तुमच्या समोर येतेय,” असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
“माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते मला जाणून घ्यायला खूप आवडेल. तुमचं प्रेम आहेच, ते अधिक वृद्धिंगत व्हावे हीच अपेक्षा,” असेही ती म्हणाली.
-
सध्या तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यासोबत ती चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान श्रेया बुगडे ही लवकरच झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ या मालिकेच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
या मालिकेत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे पाहायला मिळत आहे. मात्र त्याने मालिकेतून काही दिवस ब्रेक घेतला आहे.
-
त्यामुळे त्याच्या जागी आता अभिनेत्री श्रेया बुगडे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे.
-
सध्या श्रेया बुगडेचे चाहते तिला या मंचावर पाहण्यासाठी फारच उत्सुक झाल्याचे दिसत आहे.
-

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”