-
‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत.
-
या शोमधील कलाकार कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा द राइज’ची चर्चा पाहायला मिळत आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर पुष्पा चित्रपटातील कलाकार अवतरल्याचे दिसणार आहे.
-
‘पुष्पा’ या चित्रपटात अल्लू अर्जुनने पुष्पराज ही भूमिका साकारली आहे. तर त्याच्यासोबत रश्मिका मंदानाने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे.
-
पण‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मराठमोळ्या अवतारात ‘पुष्पा’ चित्रपटातील कलाकार दिसणार आहेत.
-
या शोच्या आगामी भागामध्ये भाऊ कदम ‘पुष्पराज’ची भूमिका साकारणार आहे.
-
तर श्रेया बुगडे ‘श्रीवल्ली’च्या भूमिकेत दिसणार आहे.
-
सध्या या आगामी भागाचा एक व्हिडीओ आणि फोटो झी मराठी शेअर केले आहेत.
-
या व्हिडीओमध्ये भाऊ कदम ‘पुष्पा’चे डायलॉग मराठी अंदाजात बोलताना दिसत आहे.
-
दरम्यान सध्या हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
सध्या प्रेक्षक हा भाग कधी प्रदर्शित होणार, याची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. (सर्व फोटो : झी मराठी/ फेसबुक)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”