बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. -
जिनिलिया ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
-
जिनिलिया ही लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक करणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.
-
जिनिलियाने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाच्या लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
यात जिनिलियाने सुंदर लेहंगा परिधान केला आहे. त्यासोबत तिने नवीन हेअरस्टाईलही केली आहे.
-
यात जिनिलिया ही फारच गोड दिसत आहे. हे फोटो शेअर करतेवेळी तिने तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे.
-
दरम्यान जिनिलियाचा हा नवा लूक पाहून मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने त्यावर कमेंट केली आहे.
ही कमेंट करताना श्रेया म्हणाली, “वहिनी तुमचा नवीन हेअरकट फारच सुंदर आहे. तसेच तुम्ही फारच गोड दिसत आहात.” -
श्रेयाच्या या कमेंटवर जिनिलियानेही तीन हार्ट इमोजी शेअर करत तिला उत्तर दिले आहे.
-
इतकंच नव्हे तर इतर अनेक कलाकार आणि तिच्या चाहत्यांनीही तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे.
-
यातील अनेक जण हार्ट, स्माईल हे इमोजी शेअर करताना दिसत आहे.
-
जिनिलिया ही लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. हा एक तेलुगु-कन्नड द्विभाषिक चित्रपट आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत कर्नाटकचे माजी मंत्री आणि लोकप्रिय उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांचा मुलगा किर्ती हा पदार्पण करणार आहे.

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या