-
अभिनेत्री क्रिती सेनॉनने बॉलिवूडमध्ये तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फार कमी काळात क्रितीने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
-
सध्या ती तिच्या आगामी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार झळकणार आहे.
-
नुकतंच क्रिती सेनॉन एक फोटोशूट केले आहे. यात तिने भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
-
एकीकडे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आहे. त्यातच तिने भगव्या रंगाचा ड्रेस परिधान करत फोटोशूट केल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे.
-
तिचे हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. काहींनी तिच्या या फोटोवर ‘ऑरेंज कँडी’ असे म्हटले आहे.
-
तर काहींनी तिचा हा फोटो पाहून ‘जय श्री राम’ अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘अप्रत्यक्षपणे भाजपला समर्थन देत आहे’, असे म्हटले आहे
-
क्रिती ही या फोटोत फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. यात तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
दरम्यान तिच्या या फोटोंचा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा काहीही संबंध नाही. तिने तिचे हे फोटो शेअर करताना #BPPromotions म्हणजे बच्चन पांडे प्रमोशन असे लिहिले आहे.
-
क्रितीचा आगामी ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट येत्या १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला आहे. तर साजिद नाडियादवाला यांनी याची निर्मिती केली आहे.
-
क्रिती ही लवकरच प्रभाससोबत आदिपुरुष या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटींग नुकतंच पूर्ण झाले आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय