-
बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
-
हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे.
-
अवघ्या दोन दिवसांपूर्वी ११ मार्चला प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.
-
विशेष म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले.
-
नुकतंच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, निर्माता अभिषेक अग्रवाल आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
-
यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले.
-
या चित्रपटाच्या टीमने पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना ते म्हणाले, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. पण या भेटीपेक्षाही त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे केलेले कौतुक हे फार खास आहेत. या चित्रपटाची निर्मिती केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. धन्यवाद मोदीजी.”
-
त्यासोबतच विवेक अग्निहोत्री यांनीही ते ट्विट रिट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यासोबत त्यांनी अभिषेकचे कौतुक केले.
-
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”