-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. अक्षय कुमार हा सध्या बच्चन पांडे चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. सध्या अक्षय कुमार हा त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
नुकतंच अक्षय कुमार हा एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमात दाखल झाला. यावेळी अक्षयसोबत क्रिती सेनॉनही उपस्थित होती. या दोघांनीही मिळून खूप धमाल केली.
-
यादरम्यान अक्षय कुमारला या चित्रपटाच्या नावावरुन एक प्रश्न विचारण्यात आला.
-
तुझ्या या चित्रपटाला ‘बच्चन पांडे’ असे नाव का देण्यात आले? असा प्रश्न त्याला एका कार्यक्रमातून विचारण्यात आला होता. नुकतंच अक्षय कुमारने याबाबतचा खुलासा केला आहे.
-
यावेळी अक्षय कुमार म्हणाला, “या चित्रपटातील माझ्या पात्राचे नाव माझाच जुना चित्रपट ‘टशन’मधून घेतले आहे.”
-
त्यावेळी माझ्या या चित्रपटातील पात्राचे नाव प्रचंड गाजले होते. यामुळेच आम्हाला ही कल्पना सुचली, असेही अक्षयने सांगितले.
-
यानंतर आम्ही ‘टशन’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची परवानगी घेतली आणि या चित्रपटासाठी ‘बच्चन पांडे’ हे नाव ठरवले, असे अक्षय म्हणाला.
-
या चित्रपटात उत्तर प्रदेशातील एका गँगस्टरची कथा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे त्या पात्राला हे नाव प्रचंड शोभत आहे.
-
‘बच्चन पांडे’ फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला आहे. तर साजिद नाडियादवाला यांनी याची निर्मिती केली आहे.
-
अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात अर्शद वारसी, क्रिती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत.
-
अक्षय हा सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अक्षय ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौड २’ मध्ये दिसणार आहे.

Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images