-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका फक्त आपल्या देशात नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे.
-
त्यात जेठालाल ही भूमिका तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेता दिलीप जोशी हे घराघरात प्रसिद्ध आहेत.
-
दिलीप जोशी हे या मालिकेतील सर्वात जास्त मानधन घेणारे कलाकार आहेत.
-
जेठालाल या पात्रासाठी निर्मात्यांची पहिली पसंती दिलीप जोशी यांना नव्हती. हे फार कमी लोकांना माहिती आहे.
-
दिलीप जोशी यांच्या आधी सिनेसृष्टीतील पाच प्रसिद्ध कलाकारांना या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती.
-
त्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणांनी नकार दिला होता. पण आता त्यांना याबाबतची खंत वाटत आहे.
-
कॉमेडी किंग राजपाल यादव यालाही जेठालाल या पात्रासाठी विचारणा करण्यात आली होती. पण इतर कामांमुळे त्याली ती ऑफर स्वीकारता आली नाही. त्यावेळी त्याला फक्त बॉलिवूडमधील करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते.
-
‘द कपिल शर्मा शो’मध्ये झळकलेल्या कॉमेडियन किकू शारदा यालाही ‘जेठालाल’ची भूमिका ऑफर करण्यात आली होती. त्यावेळी तो कपिल शर्माच्या शोमध्ये व्यस्त होता. त्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली.
-
‘भाबीजी घर पर है’ आणि ‘हप्पू की उल्टान पलटन’मध्ये या मालिकेत झळकणारा अभिनेता योगेश त्रिपाठीला जेठालाल या पात्रासाठी विचारणा करण्यात आली होती.
-
मात्र त्यावेळी त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट होते. तसेच त्याला एकाचवेळी अनेक प्रोजेक्टमध्ये काम करायचे नव्हते. त्यामुळेच त्याने निर्मात्यांना नकार दिला होता.
-
‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात दादीचे पात्र साकारणार अभिनेता अली असगर यांनाही जेठालालची भूमिका ऑफर करण्यात आली होती.
-
मात्र त्याने आधीच अनेक व्यावसायिक कमिटमेंट्स दिल्या होत्या. त्यामुळे त्याला ही भूमिका नाकारावी लागली होती.
