-
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे.
-
तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली.
-
सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबतची माहिती दिली.
-
सोनाली सध्या तिच्या पतीसोबत छान वेळ घालवताना दिसत आहे.
-
सोनाली आणि कुणाल हे मॅक्सिकोमध्ये हनिमूनसाठी गेले आहेत.
-
सोनालीने नुकतंच त्यांच्या हनिमूनचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
यात तिने छान मोनाकिनी परिधान केल्याचे दिसत आहे.
-
यात ती फार सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
-
मॅक्सिको हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी खास ओळखले जाते.
-
सोनाली आणि कुणाल हे दोघेही सध्या Secrets Maroma Beach Riviera Cancun या रिसॉर्टमध्ये राहत आहेत.
-
हे रिसॉर्ट दिसायला अतिशय सुंदर आणि प्रशस्त आहे.
-
हे रिसॉर्ट युकाटन द्वीपकल्प (Yucatan Peninsula) या ठिकाणी स्थित आहे.
-
विशेष म्हणजे मॅक्सिकोमधील सर्वात प्राचीन समुद्रकिनाऱ्यांपैकी एका समुद्रकिनाऱ्याजवळ ५०० एकरांवर हे रिसॉर्ट वसलेले आहे.
-
या ठिकाणी असलेली शुद्ध पांढरी वाळू, स्वच्छ पाणी आणि शुद्ध वातावरण यामुळे अनेक परदेशी पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे.
-
या रिसॉर्टमध्ये एकून ४१२ डिलक्स रुम आहेत. या सर्व रुममध्ये अत्याधुनिक सेवा देण्यात आल्या आहेत.
-
या रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी चार विविध पर्याय उपलब्ध आहेत.
-
सोनाली आणि कुणाल हे दोघेही Junior Suite Swim Out या रुममध्ये राहत आहेत.
-
या रुमचे प्रतिदिवसाचे भाडे 1188.39 USD इतके आहे.
-
भारतीय रुपयांनुसार हे भाडे साधारण एक ते सव्वा लाख रुपयांच्या आसपास जाते.
-
जर तुम्ही या ठिकाणी राहण्यासाठी जात असला तुमचे दोन दिवसांचे रुमचे राहण्याचे भाडे हे दोन ते अडीच लाख होते.
-
यासाठी तुम्हाला जवळपास महिनाभर आधी बुकींग करणे आवश्यक आहे.
-
मात्र Secrets Maroma Beach Riviera Cancun हे मॅक्सिकोमधील अतिशय स्टाइलिश रिसॉर्ट म्हणून ओळखले जाते.

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…