-
अभिनेत्री नरगिस फाखरी हिने रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
नरगिस फाखरीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
-
त्यानंतर ती ‘हाऊसफूल ३’, ‘अजहर’, ‘मै तेरा हिरो’, ‘बँजो’ यासारख्या अनेक चित्रपटातही झळकली होती.
-
नरगिसही आजही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
विविध भूमिका साकारत चित्रपटात झळकलेली नरगिस आता मात्र सिनेसृष्टीतून गायब झाली आहे.
-
हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख बनवल्यानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
-
नुकतंच ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत तिने अभिनयातून ब्रेक घेण्याबद्दलचे कारण सांगितले आहे.
-
त्यावर ती म्हणाली, “मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून एकही दिवस मला सुट्टी मिळाली नाही. त्यामुळेच मला हा ब्रेक घ्यावा लागला.”
-
“माझ्यासाठी माझे मित्र आणि कुटुंब हे २४ तासांच्या विमान प्रवासासारखे आहेत. ज्यांनी मी कामासोबत हाताळू शकत नाही”, असेही तिने सांगितले.
-
“त्यामुळे मी विचार केला की एवढे कष्ट करुन काय उपयोग, जर याचे योग्य फळ मिळत नसेल तर असा विचार मी माझ्या मनाशी केला”, असे नरगिसने म्हटले.
-
त्यापुढे ती पुढे म्हणाली, “मी जेव्हा सिनेसृष्टीत नवीन होती त्यावेळी अनेकांनी मला इशारा दिला होता की जर मी चित्रपटातून ब्रेक घेतला तर मी सिनेसृष्टीतून गायब होईन.”
-
“पण तरीही मी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की अशाप्रकारच्या उंदराच्या शर्यतीत मला स्वत:ला उतरावे लागले नाही.”
-
दरम्यान नरगिस फाखरी ही लवकरच पुन्हा एकदा सिनेसृष्टीत परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
काही दिवसांपूर्वी ७५ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये रॅम्पवॉक करताना दिसली होती.
-
(सर्व फोटो – नरगिस फाखरी/ इन्स्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”