-
बॉलिवूड अभिनेत्री नितू कपूर यांनी बॉलिवूड करिअरच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे.
-
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नितू कपूर पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत. पण यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
-
या ट्रोलर्सना नितू कपूर यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर रडणारी विधवा म्हणून पाहू इच्छिणाऱ्यांचं तोंड नितू कपूर यांनी बंद केलं आहे.
-
फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत नितू कपूर यांनी पतीच्या मृत्यूनंतर मजा करतीये म्हणत ट्रोल करणाऱ्यांना आपण ब्लॉक केलं आहे असं सांगितलं.
-
त्यांनी सांगितलं की, “ते काहीजण असतात ना जे पतीचा मृत्यू झालाय आणि ही बाई मजा मारतीये असं म्हणतात त्यांना मी ब्लॉक केलं आहे. त्यांना एक रडणारी विधवा पाहायची आहे”.
-
नितू कपूर यांनी यावेळी जेव्हा लोक आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावतात तेव्हा त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग अवलंबतात असं सांगितलं. आनंदी राहणं हा माझा मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं होतं.
-
“मला असंच राहायचं आहे आणि अशीच राहणार आहे. अशाचप्रकारे मी माझी मनातील जखम भरुन काढणार आहे. काही लोक रडून तर काही लोक आनंदी राहून जखम भरतात,” असं नितू कपूर यांनी सांगितलं.
-
“मी कधीही माझ्या पतीला विसरु शकत नाहीत. ते आयुष्यभर माझ्यासोबत, माझ्या मनात आणि मुलांसोबत असतील,” असंही नितू कपूर यांनी म्हटलं होतं.
-
“आजही जेव्हा आम्ही जेवण्यासाठी एकत्र येतो तेव्हा ऋषी कपूर यांच्याबद्दलच बोलत असतो. अशाचप्रकारे आम्ही त्यांची आठवण काढत असतो. रणबीरच्या मोबाइल स्क्रीनला त्यांचाच फोटो आहे. अशाचप्रकारे आम्ही त्यांची आठवण काढत असून यासाठी दुखी होण्याची गरज नाही. आम्ही त्यांची आठवण साजरी करतो,” असं नितू कपूर यांनी सांगितलं होतं.
-
नितू कपूर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.
-
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर मुलांनी आणि करण जोहरने पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं असं नितू कपूर यांनी सांगितलं होतं.
-
नितू कपूर लवकरच जुग जुग जियो चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत वरुण धवन, कियाला आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
-
याशिवाय ‘डान्स दिवाने ज्युनिअर्स’ कार्यक्रमातही त्या परिक्षक म्हणून दिसतात.

IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: अभिषेक, सूर्यानंतर गिल परतला तंबूत! टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या