-
मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम हंक म्हणून अभिनेता गश्मीर महाजनी ओळखला जातो.
-
गश्मीर हा प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे.
-
‘कॅरी ऑन मराठा’ या चित्रपटाद्वारे त्याने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच सिनेसृष्टीत वेगळी छाप निर्माण केली आहे.
-
‘देऊळबंद’, ‘कान्हा’, ‘वन वे टीकेट’ आणि ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले.
-
कलाविश्वाप्रमाणेच अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.
-
गश्मीरने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
-
यात त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. याला गश्मीर महाजनीने हटके कॅप्शन दिले आहे.
-
“रविवारची एक सकाळ”, असे कॅप्शन गश्मीर महाजनीने दिले आहे.
-
गश्मीर महाजनीने आपल्या अभिनयानं मोठा पडद्यावर काम केल्यानंतर त्याचा मोर्चा मालिकांकडेही वळवला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी उद्या मतदान; दोन पक्षांचा मतदान न करण्याचा निर्णय, एनडीएच्या उमेदवाराचे पारडे जड