-
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची गुडन्यूज चाहत्यांना दिली.
-
बाळाची गुडन्यूज दिल्यानंतर सर्वत्र त्याबाबत चर्चा सुरु आहेत.
-
प्रियांका चोप्राच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
नुकतंच प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लेकीचा एक खास फोटो समोर आला आहे.
-
यात तिची मुलगी मालती मेरी चोप्रा आणि प्रियांकाने एका रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
तर दुसरीकडे प्रियांका काही दिवसांपूर्वी तिच्या सहा महिन्याच्या मुलीला घेऊन पिकनिक एन्जॉय करण्यासाठी गेली होती. त्यावेळीही तिने तिचा एक फोटो शेअर केला होता.
-
निकनेही फादर्स डे च्या निमित्ताने मालतीसोबतचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
-
तसेच प्रियांकाने आई मधू चोप्रा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास फोटो पोस्ट केला होता. त्यात तिने मुलीची एक झलकही दाखवली होती.
-
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला होता.
-
प्रियांका आणि निकच्या मुलीचं नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे ठेवण्यात आलं आहे.
-
पण इतर फोटोंप्रमाणे या फोटोतही तिने तिच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे तिचे चाहते निराश झाले आहेत.
