-
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं.
-
‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे.‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच गाजले होते.
-
बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत राहिला आहे.
-
बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात झाला होता. या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं.
-
त्यानंतर आता बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत.
-
पण या शोसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात याबद्दल विविध चर्चा रंगल्या आहेत. नुकतंच याची माहिती समोर आली आहे.
-
महेश मांजरेकर यांची निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक अशी ओळख सांगितली जाते.
-
वास्तव, अस्तित्व, स्लमडॉग मिलियनिअर, वॉन्टेड अशा अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
-
नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का अशा सुपरहिट सिनेमांसाठी त्यांना ओळखलं जातं.
-
बिग बॉसच्या मराठीच्या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत.
-
बिग बॉस मराठीच्या एका भागासाठी तब्बल २५ लाख रुपये मानधन घेतात, असे बोललं जात आहे.
-
ते बिग बॉस मराठीच्या एकूण पर्वासाठी कोट्यावधी रुपये आकारतात.
-
बिग बॉसच्या मराठीच्या चौथ्या पर्वात त्यांच्या मानधनात आणखी वाढ होणार असल्याचे बोललं जात आहे.
-
मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या