-
कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच छोट्या पडद्यावर येत आहे. याची सध्या बरीच चर्चा आहे.
-
पण यासोबत कृष्णा अभिषेकने हा शो सोडल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
निर्मात्यांशी मानधनाच्या मुद्द्यावरून झालेल्या मतभेदांमुळे कृष्णा अभिषेकने हा शो सोडल्याचं बोललं जात आहे.
-
मात्र ‘द कपिल शर्मा शो’ सोडणारा कृष्णा अभिषेक हा पहिला कलाकार नाही. त्याच्या अगोदरही काही कलाकारांनी हा शो सोडला आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच आई झालेल्या भारती सिंहने काही दिवसांपूर्वीच या शोचा भाग नसणार असल्याचा खुलासा केला होता.
-
ती सध्या छोट्या ब्रेकवर आहे तसेच काही रिअलिटी शो सुद्धा ती होस्ट करत असल्याने तिला या शोच्या शूटिंगसाठी वेळ देता येणं शक्य नसल्याचं तिने म्हटलं होतं.
-
सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील वाद विकोला गेल्यानंतर सुनीलने या शोला रामराम केला होता.
-
कपिल शर्माने सुनील ग्रोवरच्या कानशिलात लगावल्यानंतर त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. या शोमध्ये तो ‘गुत्थी’ आणि डॉ मशहूर गुलाटी ही पात्रं साकारत होता.
-
अली असगरने साकारलेली ‘नानी’ आणि ‘दादी’ यांसह इतर पात्रं लोकप्रिय ठरली होती. पण २०१७ मध्ये त्याने हा शो सोडला.
-
अली असगरच्या मते त्याच त्या पात्रांमुळे त्याला स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला दिसत नव्हता. काम करताना मजा येत नाही असं कारणही त्याने दिलं होतं.
-
उपासना सिंहने ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘बुआ’ची पात्र साकारलं होतं. या पात्रानं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. पण नंतर तिने या शोला रामराम केला.
-
एका मुलाखतीत तिने, “काम एन्जॉय करता येत नव्हतं आणि त्यामुळे कामाचं समाधान मिळत नव्हतं म्हणून शोमधून एक्झिट घेतली” असं म्हटलं होतं.
-
सुगंधा मिश्रानेही काही काळ कपिल शर्मा शोमध्ये काम केलं होतं पण नंतर ती या शोमध्ये दिसलीच नाही.
-
एका मुलाखतीत सुगंधा म्हणाली होती, “सुनील ग्रोवरशी वाद झाल्यानंतर शोमध्ये बरेच वाद झाले आणि त्यानंतर मला पुन्हा बोलवण्यात आलं नाही.”
-
क्रिकेटर आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू या शोचा महत्त्वाचा भाग होते. चीफ गेस्ट म्हणून त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती.
-
पण राजकीय वक्तव्यामुळे झालेल्या वादानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आणि त्यांना हा शो सोडावा लागला. त्यांची जागा अर्चना पूरण सिंहने घेतली.
-
(फोटो साभार- सोशल मीडिया, इन्स्टाग्राम)

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा