-
गायक राहुल वैद्य सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्याने नुकतेच पत्नी दिशा परमारसोबत स्कॉटलँडमध्ये घालवलेल्या काही खास क्षणांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)
-
पत्नी दिशासोबतच्या या रोमँन्टिक पिकनिकचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. “फेवरेट्स विद द फेवरेट फ्रॉम अ ट्रिप” असं कॅप्शन इन्स्टाग्रामवरील या फोटोंना राहुलने दिले आहे.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)
-
१६ जुलै २०२१ रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. स्कॉटलँडमध्ये या जोडप्याने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)
-
दिशा परमारने ‘याद तेरी’ या मालिकेतून आपल्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेपासून ती प्रकाशझोतात आली.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)
-
दिशा आणि राहुलने स्कॉटलँडमधील विविध पर्यटनस्थळांना भेट दिली. या भेटीदरम्यानचे काही खास फोटो त्यांनी शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)
-
या जोडप्याला त्यांच्या चाहत्यांनी ‘#DisHul’ असं नाव दिलं आहे.(फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)
-
राहुल वैद्यने टीव्हीवर दिशा परमारला लग्नासाठी मागणी घातली होती. सोशल मीडियावरील एका कमेंटनंतर त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. (फोटो सौजन्य-राहुल वैद्य इन्स्टाग्राम)

महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…