-
अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
-
सनी लिओनी परदेशात लहानाची मोठी झाली असली तरी भारतीय संस्कृतीचीही चांगलीच समज आहे.
-
याचा अनुभव यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आला. यंदा गणेशोत्सवाच्या दिवशी सनी लिओनीची देसी अंदाज पाहायला मिळाला.
-
गणेशोत्सवासाठी सनी लिओनीने गुलाबी रंगाचा शरारा परिधान केला होता.
-
सनीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
सनी लिओनीचा हा देसी अंदाज आणि सुंदर अदांवर चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिच्या या देसी लूकचं कौतुक केलं आहे.
-
कमीत कमी मेकअप आणि एथनिक आउटफिट्समध्ये सनीचं सौंदर्य खुलून दिसतंय.
-
याशिवाय तिने तिच्या फॅमिलीसोबतही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात तिचा पती डॅनियन आणि मुलंही दिसत आहेत.
-
सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच रेमो डिसूझासह एक म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे.
-
तिचा ‘नाच बेबी’ नावाचा हा म्युझिक व्हिडीओ येत्या ६ सप्टेंबरला चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
-
(फोटो सौजन्य – सनी लिओनी इन्स्टाग्राम)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…