-
३ सप्टेंबर पासून ‘झलक दिखला जा’ हा सुप्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो सुरू झाला आहे आणि आता सेलेब्स नृत्यातील आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहेत.
-
पण जर तुम्हाला वाटत असेल की हे स्टार्स बक्षीस म्हणून मिळणाऱ्या पैशासाठी इतके प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे.
-
उलट या स्पर्धकांना शोमध्ये सहभागी होण्यासाठी लाखोंमध्ये पैसे मिळत आहेत. आज आपण जाणून घेऊया, या शोमध्ये सहभागी होणारे कलाकार एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात.
-
रुबीना दिलैक ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री असून ती सनम जोहरसह डान्स करताना दिसणार आहे.
-
रुबीना यापूर्वीही ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘बिगबॉस’ या रिअॅलिटी शोचा भाग राहिली आहे. इतकेच नाही तर तिने बिगबॉग १४ हे पर्व जिंकलेही आहे.
-
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी ती एका एपिसोडसाठी सात लाख रुपये घेत आहे.
-
‘भाभीजी घर पर हैं?’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिल्पा शिंदेही बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
-
यापूर्वी तिने ‘बिगबॉस ११’च्या खिताबावर स्वतःचे नाव कोरले आहे.
-
या शोमध्ये शिल्पाही डान्सचा जलवा दाखवणार आहे. एका अंदाजानुसार, शिल्पाला एका एपिसोडसाठी पाच लाख रुपये दिले जात आहेत.
-
टिक टॉक स्टार फैजल शेख सध्या खूप लोकप्रिय आहे. विशेषत: तरुणांमध्ये तो फारच चर्चेत असतो. त्यामुळेच त्याला ‘झलक दिखला जा’साठी विचारण्यात आले.
-
फैजल शेखला एका एपिसोडसाठी १० ते ११ लाख रुपये मिळत असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.
-
‘जमाई राजा’ आणि ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकांमधून प्रत्येकाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी निया शर्मा बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर होती.
-
आता एका रिपोर्टनुसार ती एका एपिसोडसाठी अडीच लाख रुपये घेत आहे.
-
कुंडली भाग्य फेम धीरज धूपरचेही सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.
-
एका रिपोर्टनुसार, धीरज एका एपिसोडसाठी अडीच लाख रुपये घेत आहे.
-
अनेक मालिकांमध्ये दिसलेला अली असगरही या शोचा स्पर्धक असणार आहे.
-
अली बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यावरुन गायब असून तो एका एपिसोडसाठी २ लाख रुपये घेत असल्याची चर्चा आहे.
-
टीव्ही जगतातील प्रसिद्ध नाव मराठमोळी अमृता खानविलकरही कुणापेक्षा कमी नाही.
-
शोच्या प्रीमिअरमध्येच तिने सर्वांना आपल्या नृत्याने मंत्रमुग्ध केले.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती प्रत्येक एपिसोडसाठी एक लाख रुपये घेत आहे.
-
सर्व फोटो : Instagram

“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?