-
झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही.
-
या मालिकेत अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी हिने दीपूच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
-
सध्या अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी ही तिच्या पतीसह थायलंडला सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.
-
शर्वरी ही थायलंडमध्ये फुकेट या निसर्गरम्य ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.
-
त्या दोघांनी फी फी बीचवर स्कूबा डायव्हिंगचा मजेशीर आनंदही घेतला.
-
याचे काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
थायलंडमधील शर्वरीचा कुल अंदाज प्रेक्षकांना फार आवडल्याचे दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करत ‘शेड्स ऑफ फुकेट’ असं कॅप्शन या फोटोंना दिले आहे.
-
शर्वरीनं वैभव बोरकरबरोबर २०२१ मध्ये लग्न केलं. कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी दोघांनी लग्नगाठ बांधली.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा