-
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरदेखील तो सक्रिय असतो.
-
प्रसाद ओकचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका होती.
-
या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली.
-
प्रसादच्या प्रवासावर त्याने एक पुस्तक लिहिले आहे. ‘माझा आनंद’ असं या पुस्तकाचं नाव असून नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचं अनावरण करण्यात आलं.
-
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात पार पडला.
-
या कार्यक्रमाला अभिनेते प्रसाद ओक, मंजिरी ओक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई, प्रज्ञा पोवळे, ज्येष्ठ लेखक आणि कादंबरीकार विश्वास पाटील तसेच प्रकाशक अखिल मेहता उपस्थित होते.
-
या कार्यक्रमाला अनेक वाचकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
-
‘माझा आनंद ‘ या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी आपले मत मांडले.
-
या कार्यक्रमात दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपले मत मांडले.
-
लेखक विश्वास पाटील या कार्यक्रमात हजेरी लावून आपले मत मांडले.
-
या कार्यक्रमदरम्यान वाचकांनी प्रसाद ओकची पुस्तकावर स्वाक्षरी घेतली.
-
मंजिरी ओक यांनीदेखील चित्रपटाबद्दल, पुस्तकाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. फोटो सौजन्य : फेसबुक

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी सुरूच! भारताला धमकी देत म्हणाले, “प्रत्युत्तर दिले तर…”