-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. सध्या ती गरोदरपण एन्जॉय करतेय.
-
सध्या सोशल मीडियावर व्हायरल आलिया- रणबीरचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
-
ज्यात डिनरनंतर आलिया भट्ट, नीतू कपूर आणि रणबीर कपूर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.
-
आलिया- रणबीरचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीर कपूरला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
-
या फोटोंमध्ये आलिया, रणबीर आणि नीतू कपूर हे तिघंही रेस्टॉरंटमधून बाहेर पडत आहेत आणि त्यावेळी नीतू कपूर आपल्या मुलाचा हात पकडून चालताना दिसतायत.
-
तर आलिया एकटीच या दोघांच्या पुढे चालत असलेली दिसत आहे.
-
यावरून रणबीरला ट्रोल केलं जातंय कारण आलिया गरोदर असताना तिला आधार द्यायचं सोडून रणबीर त्याच्या आईबरोबर चालताना दिसत आहे.
-
सोशल मीडियावरील काही युजर्स तर नीतू कपूर यांना पजेसीव्ह म्हणताना दिसत आहेत.
-
युजर्सचं म्हणणं आहे की, जेव्हा रणबीर सुरुवातीला आलियाचा हात पकडत होता तेव्हा नीतू यांनी त्याला तिचा हात पकडू दिला नाही त्या स्वतः त्याचा हात पकडून चालू लागल्या.
-
एका युजरने या फोटोंवर कमेंट करताना लिहिलं, “इथे नक्की प्रेग्नंट कोण आहे, आलिया की याची आई.”
-
तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “सासू आणि नवऱ्याला गरोदर असलेल्या आलियाशी काही देणं घेणं नाही. खरं तर त्याने आलियाचा हात पकडायला हवा.”
-
आणखी एका युजरने लिहिलं, “आलिया प्रेग्नंट असूनही पुढे एकटी चालली आहे. खरं तर रणबीर किंवा नीतू कपूर यांनी पुढे चालायला हवं किंवा किमान आलियासोबत असायला हवं. पण ती एकटी चालली आहे आणि आई मुलाचा हात पकडून चालत आहे हे खूप विचित्र आहे.” (फोटो साभार- विरेंद्र चावला, इंडियन एक्सप्रेस आणि आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…