-
काजोल, तिची बहीण तनिषा आणि त्यांची आई तनुजा यांच्यात असणारं बॉंडिंग सर्वांनाच आवडतं. अनेक कार्यक्रमांमध्ये त्या एकत्र दिसतात.
-
आता काजोल आणि तनिषाने त्यांची आई तनुजा यांना लोणावळ्यात सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध असलेला एक बंगला भेट दिला आहे.
-
काजोल आणि तनिषा तनुजा यांना गाडीतून लोणावळ्याला घेऊन आल्या आणि हा बंगला भेट देत मोठं सरप्राईज दिलं.
-
गेटच्या बाहेर बांधलेली मोठी लाल रंगाची रिबीन कापत तनुजा यांनी या बंगल्यात प्रवेश केला.
-
मोठ्या लकडी गेटमधून आत आल्यावर अंगणात दोन्ही बाजूला भरपूर झाडं आहेत.
-
तर घरच्या मुख्य दरवाजा सागवानी लकडपासून बनवला आहे.
-
तनुजा यांनी घरात पहिलं पाऊल टाकताच त्यांनी या वास्तूला नमस्कार केला.
-
त्याच पाठोपाठ काजोल आणि तनिषानेही या वास्तूला नमस्कार केला.
-
या घरात सर्वत्र एलईडी लाइट्स बसवण्यात आलेले आहेत. या घराच्या हॉलला पांढऱ्या रंगाने रंगवण्यात आलं आहे. आठ महिने या बंगल्याचं काम सुरू होतं. त्या दोघींनी तनुजा यांना या बंगल्याबद्दल जराशी ही माहिती लागू न देता या बंगल्याचं सगळं काम करून घेतलं आहे.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल