-
‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ८ जानेवारी पार पडला. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
-
गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या विजेतपदाचा मान पटकावला. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
-
तीन महिन्यापूर्वी सुरू झालेला बिग बॉस मराठी ४ चं पर्व ८ जानेवारीला संपलं. यंदाचं हे पर्व अनेक स्पर्धकांमुळे गाजलं. पण अखेरीस अभिनेता अक्षय केळकरने या परवाच्या जेतेपदावर आपले नाव कोरले.
-
अक्षय केळकर हा हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी अक्षयने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्याने ओटीटी वेब सीरिज ‘नीमा डेन्झोंगपा’ आणि कॉमेडी सीरियल ‘भाखरवडी’मध्येही काम केले आहे.
-
बँग बँग या मराठी वेबसिरीजचाही तो भाग होता. त्याने काही चित्रपट देखील केले आहे. त्याचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘टकाटक 2’ होता.
-
या पर्वात सहभागी झाल्यानंतर अक्षय अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला आणि हळू हळू शिडी चढत त्याने टॉप ५ स्पर्धकांमध्ये आपले स्थान निश्चित केले.
-
आज आपण अक्षय केळकरच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
-
अक्षय केळकरने निमा डेन्झोंगपा या हिंदी मालिकेत सुरेशची मुख्य भूमिका साकारली होती.
-
अक्षय या मालिकेद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आला आणि निमा डेंगझोपा ते बीबी मराठी ४ पर्यंतच्या त्याच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली.
-
अक्षयने तीन महिन्यांपूर्वी मराठी रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस मराठी ४ चा एक स्पर्धक म्हणून भाग घेण्याचा निर्णय घेतला.
-
अक्षयने बिग बॉस मराठी ४ च्या घरात प्रवेश केला आणि घरातील सर्वात मजबूत खेळाडूंपैकी एक बनला.
-
अक्षय हा बिग बॉस मराठी ४ चा ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखला जायचा. अक्षय त्याच्या स्वभावामुळे घरात अनेकवेळा शारिरीक आणि शाब्दिक वादात सापडला.
-
त्याच्या या स्वभावमुळेच अक्षय होस्ट महेश मांजरेकर यांच्या घरातील सर्वात जास्त ओरडा मिळालेल्या स्पर्धकांपैकी एक बनला.
-
मुख्यतः त्याला शारीरिक मारामारीसाठी धारेवर धरण्यात आले होते. महेश मांजरेकर यांनी असेही म्हटले होते की, ‘अक्षयकडे सुपीरिटी कॉम्प्लेक्स आहे.’
-
अक्षयने घरात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरसोबत खूप खास बॉन्ड शेअर केला आहे. घरात दोघांची छान मैत्री होती पण नंतर काही कारणास्तव दोघांनीही वैयक्तिकरित्या खेळण्याचा निर्णय घेतला.
-
ठाण्यात जन्मलेला अक्षय वरळीच्या एलएस रहेजा स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. अक्षय मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे.
-
शोमध्ये महेश मांजरेकर यांच्याशी झालेल्या संभाषणात अक्षय म्हणाला होता की, “मी इथे ऑटोरिक्षाने पोहोचलो. हा एक खास क्षण आहे कारण माझे वडील ऑटो-रिक्षा चालक आहेत आणि त्यांनीच मला बिग बॉस मराठी 4 च्या सेटवर सोडले होते.”
-
“मी त्यांना अनेक वेळा ऑटो ड्रायव्हिंग सोडण्यास सांगितले पण ते ऐकत नाहीत. ते म्हणतात की त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करायचे आहे आणि कमवायचे आहे.”
-
अक्षयने सांगितले की, आपला मुलगा आता स्टार झाला आहे किंवा कमावत आहे म्हणून त्याचे वडील कमाई करणे थांबवू इच्छित नाहीत. त्यांना नेहमी आपले काम करून स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते.
-
अक्षय केळकर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर आता अनेक चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहे. बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर अक्षय केळकरच्या नावाचा ट्रेंडही सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.
-
सर्व फोटो: Instagram

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”