-
शनिवारी मुंबईत पार पडलेल्या नेटफ्लिक्स नेट्वर्किंगच्या पार्टीला हटके अंदाजात बॉलिवूडच्या सिनेतारकांनी हजेरी लावली.
या पार्टीसाठी भूमी पेडणेकरने जाळीदार काळा टॉप आणि फिटेड रफल स्कर्ट असा कमाल ऑल ब्लॅक लूक केला होता. (Photo: Varinder Chawla) -
अभिनेत्री करिष्मा तन्ना झेब्रा प्रिंटेड डीप नेक मिनी ड्रेसमध्ये कमाल दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
-
अभिनेता रोहित सराफने सफेद शर्ट, काळी पॅण्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा क्रॉप जॅकेट असा लुक करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (Photo: Varinder Chawla)
-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील लाल क्रॉप टॉप आणि त्याला मॅचिंग लाल स्कर्ट आणि लाल श्रग हटके लूक केला होता. (Photo: Varinder Chawla)
-
बी टाऊन मधील स्टायलिश जोडी जॅकी भगनानी आणि राकुल प्रीत सिंग यांनीही हजेरी लावली होती. यावेळी जॅकीने सफेद शर्ट, काळी पॅण्ट आणि वेलवेट ब्राउन जॅकेट असा लूक केला होता तर राकुल देखील काळ्या रंगाच्या लेदर ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
-
फिकट ब्राउन रंगाच्या विणलेल्या स्कर्ट आणि टॉप या को-ऑर्ड सेटमध्ये ख़ुशी कपूर कमाल दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
-
अभिनेता अभय देओल सफेद टी-शर्ट, डेनिम जीन्स आणि त्यावर मॅचिंग निळ्या रंगाचे जॅकेट अशा लूकमध्ये आला होता. (Photo: Varinder Chawla)
-
‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्ज’ फेम महिप कपूर, सीमा सजदेह आणि भावना पांडे यांनी अनुक्रमे निऑन, राखाडी आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पार्टीला हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
कपिल शर्माने पार्टीसाठी सफेद डेनिम जीन्स, निळा टी-शर्ट आणि निळ्या जॅकेट असा कूल लूक केला होता. (Photo: Varinder Chawla)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर