-
मनोरंजन विश्वातील सर्वांत वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिगबॉसचं ओटीटीचं दुसरं पर्व आजपासून सुरू होणार आहे.
-
हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच यामध्ये सहभागी होणारे स्पर्धक आणि घराचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
आज आपण या बहुचर्चित कार्यक्रमाच्या घरच्या आतील फोटो पाहुयात.
-
बिगबॉस ओटीटी २ शोच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आलेले फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत.
-
बिगबॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचे घर अतिशय महागड्या आणि आकर्षक वस्तूंनी सजवण्यात आले आहे. हे वेगवेगळ्या रंगांनी रंगावण्यात आले आहे. त्यामुळे या घराचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे.
-
या घरच्या डायनिंग एरियामध्ये एक लाल आणि पांढऱ्या रंगाचा टेबल असून त्याच्याबरोबर काळ्या रंगाच्या खुर्च्या आहेत.
-
या घरच्या छताला वेगवेगळी आणि मोठे झुंबर लावण्यात आले आहे.
-
घरचा किचन एरियाही खूप सुंदर आहे. या भागालाही आकर्षक रंगसंगतीमध्ये रंगावण्यात आले आहे.
-
येथे बिगबॉसचा डोळा काढण्यात आला असून येथे पिवळ्या रंगाच्या दोन खुर्च्या आणि एक टेबल ठेवण्यात आला आहे.
-
घराच्या लिव्हिंग एरियामध्ये पांढरे आणि काळे कॉम्बिनेशन सोफे बसवले आहेत. याच बरोबर वीकेंड वॉरमध्ये स्पर्धकांना बसण्यासाठी येथे पिवळा सोफा बसवण्यात आला आहे.
-
घराच्या बेडरूमबद्दल बोलायचं झालं तर ते देखील खूप रंगेबिरंगी आहे. यामध्ये अनेक डबल बेड बसवले आहेत.
-
बिग बॉस ओटीटी २ आज म्हणजेच १७ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Jio Cinema वर स्ट्रीम होणार आहे. (bigg.boss_ott)

Donald Trump Fresh Tariff Threat : ‘अमेरिकेच्या टेक कंपन्यांचा सन्मान करा, अन्यथा…’; ट्रम्प यांची पुन्हा टॅरिफ लादण्याची धमकी