-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री-गायिका स्वानंदी टिकेकरचा काल (२३ जुलै) रोजी साखरपुडा पार पडला.
-
काही दिवसांपूर्वी स्वानंदीने आशिष कुलकर्णीबरोबरचा फोटो शेअर करत रिलेशनशिपबाबत घोषणा केली होती.
-
स्वानंदी टिकेकरने साखरपुडा सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
And We’re Engaged! असं कॅप्शन स्वानंदीने या फोटोंना दिल आहे.
-
साखरपुडा सोहळ्यासाठी स्वानंदीने पेस्टल पिस्ता रंगाची साडी नेसली होती.
-
स्वानंदीच्या पेस्टल ब्लाऊजवरील सुंदर डिझाईनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
आशिषने ही स्वानंदीच्या साडीला मॅचिंग असे जॅकेट परिधान केले होते.
-
स्वानंदी आणि आशिषच्या फोटोंवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटोंसाठी #SwanandiAshish असा हॅशटॅग तयार करण्यात आला होता.
-
या दोघांच्या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे.
-
स्वानंदीने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’ आणि ‘अगं अगं सुनबाई…’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
-
स्वानंदीचा होणार नवरा आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे.
-
सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गायनाच्या कार्यक्रमाचे विजेतेपद स्वानंदीने पटकावले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक