-
दिव्या भारती ही बॉलिवूडची खूप सुंदर आणि तेवढीच उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री होती. नाव, पैसा, स्टारडम सगळं मिळालं. मात्र वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. (फोटो सौजन्य-दिव्या भारती, फेसबुक पेज)
-
१९९८८ ते १९९२ इतकाच काळ ती चित्रपटांमध्ये काम करु शकली. १९९३ मध्ये तिचा मृत्यू झाला.
-
आपल्या छोट्याश्या करिअरमध्ये दिव्या भारती आघाडीची स्टार झाली होती. कारण तिने सुनील शेट्टी, ऋषी कपूर, सनी देओल, चंकी पांडे, शाहरुख खान या सगळ्यांसह काम केलं.
-
दिव्या वयाच्या १४ व्या वर्षापासून काम करु लागली होती. तिचं सात समुंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी हे गाणं आजही लोकांच्या स्मरणात आहे.
-
निर्माता साजिद नाडियादवालाशी दिव्याचं लग्न झालं होतं.
-
दिव्या भारतीच्या मृत्यूची बातमी ५ एप्रिल १९९३ ला सगळ्यांनाच समजली. ती जेव्हा हे जग सोडून गेली तेव्हा तिचे १४ चित्रपट सुरु होते. इतकी बिझी असणारी ती त्या काळातली आघाडीची अभिनेत्री ठरली होती.
-
दिव्या भारतीचा चेहरा श्रीदेवीसारखा होता. ती दिसायला जितकी सुंदर होती तितकाच तिचा अभिनयही खूप छान होता. त्यामुळेच ती स्टार पदावर जाऊन बसली.
-
वयाच्या १४ व्या वर्षी पदार्पण आणि वयाच्या १८ व्या वर्षी दिव्या सुपरस्टार झाली होती. मात्र १९ व्या वर्षीच ती हे जग सोडून गेली.
-
दिल का क्या कसूर?, दिल आशना है, दिवाना, विश्वात्मा, शोला और शबनम, रंग, दुश्मन जमाना, क्षत्रिय अशा एकाहून एक सरस सिनेमांमध्ये तिने काम केलं होतं. तिचं काम आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
-
वयाच्या १९ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत असं सांगितलं जातं की ती तिच्या नव्या घराच्या खिडकीतून खाली कोसळली आणि त्यातच तिचा अंत झाला. आता तिने ही उडी मारली होती की तिला कुणी धक्का दिला आणि तिला मारलं हे गूढ अद्यापही गूढच आहे. तिच्या मृत्यूची फाईल आता बंदही झाली आहे.
