-
आज २६ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय श्वान दिन साजरा केला जातोय.
-
त्यानिमित्ताने श्वानांवर आधारित काही जगप्रसिद्ध चित्रपटांच्या यादीवर एक नजर टाकुयात.
-
‘हची अ डॉग्स टेल’ हा यादीत पहिल्या नंबरवर असणारा चित्रपट आहे. एका प्राध्यापकाला एक कुत्रा सापडतो आणि तो त्याच्या घरी घेऊन जातो. नंतर त्या दोघांचं एक अतूट नातं तयार होतं.
-
“टोगो” हे यादातील पुढचं नाव. २०१९ मधील हा चित्रपट चॅम्पियन डॉगस्लेड ट्रेनर लिओनहार्ड सेपला आणि त्यांचा कुत्रा टोगो यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे.
-
A Dog’s Purpose : कुत्रा वेगवेगळ्या वेळी चार वेगवेगळ्या मालकांसोबत आयुष्य जगतो. या प्रवासात त्याला त्याचा खरा उद्देश कळतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.
-
द कॉल ऑफ़ द वाइल्ड : हा चित्रपटही कुत्र्यावर आधारित आहे.
-
Eight Below: जेरी आणि त्याचे कुत्रे अंटार्क्टिकच्या मोहिमेवर जातात. पण जोरदार हिमवादळामुळे त्याला त्याच्या कुत्र्यांना मागे सोडावे लागतं. अचानक मिशन बंद झाल्याने कुत्रे तिथेच राहून जातात.
-
Bolt: हा २००८ मध्ये आलेला चित्रपट टीव्ही शोमध्ये काम करणाऱ्या एका श्वानावर आधारित आहे.
-
Max: २०१५ मध्ये आलेला हा चित्रपट आहे. एका जखमी लष्करी कुत्र्याला त्याच्या दिवंगत हँडलरचे कुटुंब दत्तक घेते आणि नंतर हँडलरच्या मृत्यूबाबत अनेक गोष्टी समोर येऊ लागतात. आजूबाजूच्या कथेत परिस्थिती उलगडू लागते.
-
बीथोव्हेन ही आठ अमेरिकन चित्रपटांची सीरिज आहे, जॉन ह्यूजेस आणि एमी होल्डन जोन्स यांनी त्याची निर्मिती केली होती.याची कथा एका कुटुंबाभोवती फिरते जे त्यांच्या पाळीव कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. यातील पहिले दोन चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले होते.
-
Dogs: २०२२ मध्ये आलेला हा चित्रपट कुत्र्यावर आधारित आहे.
-
(सर्व फोटो- पिक्साबे व अनप्लॅशवरून साभार)

बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? नागपुरात भर दिवसा तरुणीला अश्लिल स्पर्श करत हद्दच पार केली; नराधमाचा VIDEO पाहून धक्का बसेल