-
बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डाने अभिनेत्री लिन लैश्राम हिच्याशी २९ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अभिनेत्याने मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. रणदीपने लिनसोबतच्या रिसेप्शन पार्टीचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी रणदीप हुड्डा ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. त्याची पत्नी लिन लैश्राम पारंपारिक पोशाखात दिसली. यावेळी नवविवाहित वधू लिनने लाल रंगाची साडी परिधान केली होती.
-
या रिसेप्शन पार्टीत अनेक बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सनीही हजेरी लावली होती.
-
यावेळी अभिनेत्री लिनचे आई-वडील आणि कुटुंबीयही दिसले. लिनच्या कुटुंबाने यावेळी पारंपारिक मणिपुरी पोशाख परिधान केला होता. लिनची आई गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती.
-
रणदीप हुडाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जॅकी श्रॉफ क्रीम रंगाच्या ब्लेझर व ट्राउझर्समध्ये दिसले.
-
या रिसेप्शनमध्ये अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया एकत्र पोहोचले.
-
रिसेप्शनमध्ये अभिनेते गजराज राव यांनीही कॅमेऱ्यासमोर पोज दिली.
-
अभिनेत्री रसिका दुग्गलने रिसेप्शनला साडी नेसली होती.
-
डेझी शाहनेही या पार्टीत आपली हजेरी लावली.
-
लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकरही आले होते.
-
चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज पत्नी रेखा भारद्वाज लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित होते.
-
या पार्टीत अभिनेता सनी हिंदुजा पत्नीसोबत दिसला.
-
डायरेक्टर इम्तियाज अली मुलगी इदासह पार्टीत पोहोचले होते.
-
या रिसेप्शन पार्टीत जावेद जाफरी आणि चंकी पांडेही उपस्थित होते.
-
या रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीही सहभागी झाली होती.
-
अभिनेता शरद केळकर पत्नी कीर्तीसोबत लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचला.
-
रिसेप्शनमध्ये युलिया वंतूर बेज रंगाचा शरारा परिधान करून पोहोचली होती.
-
अभिनेत्री तारा शर्मा सलुजा आणि निर्माते रुपक सलुजा यांनीही पार्टीला हजेरी लावली.
-
अभिनेत्री टिस्का चोप्राने लग्नाच्या रिसेप्शनसाठी शाही निळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत हजेरी लावली. तिने मरून रंगाचा शिमरी बॅकलेस गाऊन परिधान केला होता.
-
रणदीप आणि लिनच्या रिसेप्शनसाठी सयानी गुप्ता फिकट गुलाबी रंगाच्या साडीत पोहोचली होती.
(फोटो स्रोत: इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”