-
साऊथ आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा ‘बाहुबली’ चित्रपटातील भल्लालदेव उर्फ राणा दग्गुबाती याने आपल्या करिअरमध्ये आजवर अनेक भूमिका केल्या आहेत.
-
पण भल्लालदेव भूमिका साकारून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. राणाने तेलुगू तसेच हिंदी आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याची फॅन फॉलोइंग खूप आहे.
-
राणाने नेहमीच आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का की ३९ वर्षांचा अभिनेता राणा दग्गुबाती एका डोळ्याने पाहू शकत नाही. खुद्द अभिनेत्याने त्याच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
-
अभिनेता म्हणाला होता, “मला माझ्या उजव्या डोळ्याने दिसत नाही. मी फक्त माझ्या डाव्या डोळ्याने पाहू शकतो आणि हा डावा डोळा सुद्धा एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोणीतरी मला दान केला होता. जर मी माझा डावा डोळा बंद केला तर मला काहीही दिसत नाही. लहानपणापासून मला दिसत नव्हतं. माझ्या डोळ्याचं ऑपरेशनही झालं होतं.”
-
राणा दग्गुबातीने या समस्येला न जुमानता केलेलं काम हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पण अभिनेता होण्यापूर्वी राणा एक VFX कंपनी चालवायचा. अभिनेत्याने याबद्दल माहिती दिली होती
-
. त्याने २००४ मध्ये व्हिज्युअल इफेक्ट्सने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.
-
अभिनेता म्हणाला, “मी व्हिज्युअल इफेक्ट्स निवडले कारण मला माहित होतं की चित्रपट उत्कृष्ट बनवण्यात व्हिज्युअलचा सर्वात मोठा वाटा असतो. पण लवकरच मला समजलं की जर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचे असेल, तर तुम्ही फक्त मनोरंजन क्षेत्रात असणं पुरेसं नाही.”
-
नंतर राणाने चित्रपटांमध्ये अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. त्याने अभिनयाचं थोडं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर अभिनयाच्या दुनियेत आल्यावर लोकांची मनं जिंकली.
-
या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे.
-
कमाईच्या बाबतीत राणा मोठ्या कलाकारांनाही मागे टाकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ४५ कोटी रुपये आहे. तो त्याच्या एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये घेतो.
-
अभिनेत्याव्यतिरिक्त राणा एक चित्रपट निर्माता, फोटोग्राफर आणि बिझनेसमन देखील आहे. तो ब्रँड एंडोर्समेंटमधून सुमारे ७० ते ८० लाख रुपये कमावतो.
-
या अभिनेत्याला लक्झरी कारचीही आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये ७७ लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ GL350 CDI, १.६८ कोटी रुपयांची BMW 7-Series, ७० लाख रुपयांची Jaguar XF, ४४.२८ लाख रुपयांची Honda Accord आणि ३२.८४ लाख रुपयांची Honda CRV यांचा समावेश आहे.
(सर्व फोटो : @ranadaggubati/instagram)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली