-
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांचे लग्न लवकरच होणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. (फोटो: रिया सम्राट लुथरा/इन्स्टाग्राम)
-
या जोडप्याने लग्नाबाबत काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु त्यांच्या अलीकडच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो: रिया सम्राट लुथरा/इन्स्टाग्राम)
-
पुलकित व क्रितीचे काही फोटो समोर आले आहेत, त्यात चाहत्यांना या जोडप्याच्या बोटांमध्ये एंगेजमेंट रिंग्ज दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी साखरपुडा केल्याची चर्चा आहे. (फोटो: रिया सम्राट लुथरा/इन्स्टाग्राम)
-
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लग्न करू शकतात, अशा चर्चा आहेत. (फोटो: पुलकित सम्राट/इन्स्टाग्राम)
-
क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांची प्रेमकहाणी ‘पागलपंती’च्या सेटवर सुरू झाली आणि तेव्हापासून ते एकत्र आहेत. (फोटो: पुलकित सम्राट/इन्स्टाग्राम)
-
या दोघांनी ‘वीरे की वेडिंग’ आणि’ तैश’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. (फोटो: क्रिती खरबंदा/इन्स्टाग्राम)
-
क्रितीने पूर्वी एकदा ETimes ला तिच्या लग्नाबद्दल म्हणाली होती, “मी लग्नाबद्दलच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर फक्त माझ्या पालकांनाच देईन. कारण मला वैयक्तिक गोष्टी खासगी ठेवायला आवडतं.” (फोटो: क्रिती खरबंदा/इन्स्टाग्राम)
-
“जेव्हा पुलकित आणि मी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, तेव्हा मी याबद्दल खूप मोकळेपणाने बोलत होते. मी नातंही लपवलेलं नाही,” असं क्रिती म्हणाली. (फोटो: क्रिती खरबंदा/इन्स्टाग्राम)
-
ती पुढे म्हणाली, “माझं नातं माझ्यासाठी खूप पवित्र आहे. या अशा गोष्टी आहेत ज्या खासगी आहेत आणि फक्त माझ्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल आहेत.” (फोटो: क्रिती खरबंदा/इन्स्टाग्राम)
-
बॉम्बे टाईम्सशी बोलताना पुलकित म्हणाला होता की आम्ही एकमेकांना कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. आम्ही दोघेही महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहोत. (फोटो: क्रिती खरबंदा/इन्स्टाग्राम)
-
क्रिती आपल्यासाठी खूप लकी असल्याचं पुलकित म्हणाला होता.
-
(फोटो: क्रिती खरबंदा/इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक