-
आपण जाणून घेणार आहोत अशा अभिनेत्रींबाबत ज्यांचं करिअर एका चित्रपटानंतर जवळपास संपलं. या यादीतलं पहिलं नाव आहे मंदाकिनीचं. मंदाकिनी ही तिच्या काळातली गाजलेली अभिनेत्री होती. राम तेरी गंगा मैली हो गयी हा तिचा सिनेमा चर्चेत राहिला. (फोटो-मंदाकिनी, फेसबुक पेज)
-
मंदाकिनीचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसह जोडलं गेलं. या दोघांचे काही फोटो व्हायरल झाले आणि तिचं करिअर जवळपास संपलंच. तिने पुढे इतर चित्रपटही केले पण तेजाब वगळता इतर चित्रपटांची फारशी चर्चा झाली नाही. (फोटो-मंदाकिनी फेसबुक पेज )
-
९० च्या दशकात आलेला आशिकी हा चित्रपट सुपरडुपरहिट ठरला. त्यातली अन्नू अग्रवाल आणि राहुल रॉयची जोडीही प्रेक्षकांना भावली. (अन्नू अग्रवालचे सर्व फोटो- फेसबुक पेज (अन्नू अग्रवाल))
-
अन्नू अग्रवाल ही अभिनेत्री आवडत नाही असा एकही मुलगा त्या काळात नव्हता. मात्र एक अपघात झाला आणि त्यामुळे तिचं आयुष्यच बदललं.
-
अपघातामुळे अन्नू अग्रवालला सर्जरी करावी लागली. ज्यानंतर आता तिला ओळखणंही जवळपास कठीण झालं आहे.
-
भाग्यश्रीने तिचा वाढदिवस नुकताच साजरा केला. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तसंच तिने विविध चित्रपटांमधून कामंही केली. पण ती ओळखली जाते मैने प्यार कियासाठीच.
-
भूमिका चावला ही भाग्यश्रीसारखीच दिसणारी अभिनेत्री. सलमान खानच्या तेरे नाम सिनेमात ती त्याची नायिका होती. सभ्य, सुसंस्कृत दिसणारी भूमिका याच सिनेमासाठी ओळखली जाते. (दोन्ही फोटो सौजन्य-भूमिका चावला, इंस्टाग्राम पेज )
-
भूमिकाने नंतर काही चित्रपटांमध्ये काम केलं. पण ती ओळखली गेली ती तेरे नामसाठीच. तिला तेवढी प्रसिद्धी इतर चित्रपटांसाठी मिळाली नाही.
-
ग्रेसी सिंग हे या यादीतलं पुढचं नाव आहे. लगान आला तेव्हा त्यातला तिचा सोज्वळ चेहरा लोकांना भावला. मात्र नंतर ती फार चमकदार कामगिरी करु शकली नाही. (दोन्ही फोटो-ग्रेसी सिंह, फेसबुक पेज)
-
ग्रेसी मुन्नाभाईमध्ये चिंकीच्या भूमिकेत झळकली, तसंच अजय देवगणच्या गंगाजलमध्येही होती. मात्र तिची लक्षात राहिलेली भूमिका लगानमधलीच होती यात शंका नाही.
-
स्नेहा उलालकडे ऐश्वर्या रायची लुक लाईक म्हणून पाहिलं गेलं. पण स्नेहा लकी या सिनेमाशिवाय दुसऱ्या कुठल्याही सिनेमात तिची जादू दाखवू शकली नाही. हळूहळू तीपण लाईमलाईटमधून बाहेरच पडली. (दोन्ही फोटो सौजन्य- स्नेहा उलाल, फेसबुक पेज)
-
स्नेहाचा लुक खरोखरच ऐश्वर्या सारखाच होता. खास करुन तिचे ते स्वप्नाळू डोळे. पण तिच्या अभिनयात काहीही चमक दिसली नाही. त्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतापासून लांब गेली.
-
स्वदेस सिनेमात शाहरुख खानसह झळकलेल्या गायत्री जोशीनेही एक सिनेमा करुन सिनेसृष्टीला राम राम केला. (दोन्ही फोटो सौजन्य-गायत्री जोशी फेसबुक पेज)
-
गायत्रीने असं का केलं? हे कुणालाच माहीत नाही. पण तिचं स्वदेसमधलं काम आजही लोकांच्या स्मरणात आहे. तसंच ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.
-
नर्गिस फाकरी या अभिनेत्रीनेही फक्त रणबीर कपूरसह केलेला रॉकस्टार हाच सिनेमा सुपरहिट ठरला. यानंतर तिने इतर चित्रपटांमध्येही भूमिका केल्या पण त्या लोकांच्या स्मरणात नाहीत. (दोन्ही फोटो सौजन्य-नर्गिस फाकरी, फेसबुक पेज)
-
नर्गिसने आत्तापर्यंत १० ते १२ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तिचा लक्षात राहिलेला रोल हा रॉकस्टारमधलाच आहे. मद्रास कॅफेमध्येही तिने केलेली भूमिका लोकांना फारशी भावली नाही.
