-
बॉलीवूडमध्ये अनेक विषय चर्चेत असतात. कधी सेलिब्रिटींच्या चित्रपटांबद्दल तर कधी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल.
-
बॉलीवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या खाजगी आयुष्याशी संबंधित गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतात.
-
नुकतीच आई झालेली अभिनेत्री इलियाना डिक्रुझने डिलिव्हरीनंतरचा तिचा अनुभव शेयर केला आहे.
-
1 ऑगस्ट 2023ला अभिनेत्री इलियानाने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला.
-
ही गोड बातमी इलियानाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे चाहत्यांना सांगितली.
-
नुकतंच इलियाना डिक्रुझ एका नव्या पोस्टच्या माध्यमातून तिचा मातृत्व प्रवास आणि प्रसूतीनंतरच्या अनुभवावर व्यक्त झाली आहे.
-
कॅप्शनमध्ये इलियाना म्हणाली, “हाय, बऱ्याच वेळाने माझा फोटो काढला आहे किंवा काहीतरी पोस्ट करते आहे… पूर्णवेळ आई असणे आणि घरी राहणे या दरम्यान, मला वेळ मिळतं नाही. मी बहुतेक वेळ पायजम्यामध्ये असते. सध्या मी एक गोंधळलेली आई बनले आहे. मी नेहमी माझे केस माझ्या चिमुक्याच्या हातापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते. कदाचित म्हणूनच सेल्फी काढण्याचा विचार माझ्या मनात येत नाही. झोप कमी मिळत असल्याने मला त्रासही होतो.”
-
तिने पोस्टमध्ये पुढे लिहले होते की, “निश्चितपणे मी तक्रार करण्याचा प्रयत्न करत नाही कारण हे मूल माझ्यासोबत घडणारी सर्वात सुंदर गोष्ट आहे. परंतु प्रसूतीनंतरच्या नैराश्याबद्दल कुणीच बोलत नाही. मी स्वतःला बरे वाटण्यासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. ३० मिनिटांची कसरत आणि ५ मिनिटांचा शॉवर खरोखरच माझ्यासाठी चांगले काम करते. पण कधीकधी मी या गोष्टीही नीट करू शकत नाही.”
-
“मी अशा आईपैकी एक नाही ज्यांनी बाऊंस बॅक केले आहे. मी स्वतःवर आणि माझ्या शरीरावर वेळ घेत आहे.” असे कॅप्शन लिहून इलियानाने आपले अनुभव व्यक्त केले.
-
“मी अशा आईपैकी एक नाही ज्यांनी बाऊंस बॅक केले आहे. मी स्वतःवर आणि माझ्या शरीरावर वेळ घेत आहे.” असे कॅप्शन लिहून इलियानाने आपले अनुभव व्यक्त केले.
-
(सर्व फोटो: इलियाना डिक्रूझ/इन्स्टाग्राम)

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ