-
बॉलिवूडमध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जोडी ही सुपरहिट जोडी मानली जात होती. या दोघांनी अनेक चित्रपट बरोबर केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-फेसबुक पेज-Sridevi)
-
१९९३ मध्ये या दोघांचा एक सिनेमा आला होता. या सिनेमाचं नाव होतं रुप की रानी चोरो का राजा.
-
रुप की रानी चोरो का राजा हा सिनेमा सुरुवातीला शेखर कपूर दिग्दर्शित करत होते. मात्र त्यांनी काही कारणाने हा सिनेमा सोडला.
-
यानंतर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आली ती सतीश कौशिक यांच्या खांद्यावर. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता.
-
रुप की रानी चोरो का राजा या सिनेमात अनिल कपूर, श्रीदेवी, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर अशी तगडी स्टारकास्ट होती.
-
बोनी कपूर हे या सिनेमाचे निर्माते होते.
-
या सिनेमाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सतीश कौशिक यांनी बोनी कपूर यांची सिनेमा सुपरफ्लॉप झाल्याबद्दल माफी मागितली होती.
-
रुप की रानी चोरो का राजा या सिनेमासाठी अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना खास कॉस्ट्युम दिले गेले होते.
-
१९९३ मध्ये या सिनेमासाठी ९ कोटी रुपयांचा खर्च आला होता. हा सिनेमा खूप जास्त कमाई करेल असं वाटलं होतं. मात्र सिनेमाने ३ कोटींची कमाई केली.
-
या चित्रपटाच्या प्रीमियरला अमिताभ बच्चन, सुभाष घई आले होते. त्यांनी तो शो पाहूनच चित्रपट फ्लॉप आहे चालणार नाही हे सांगितलं होतं.
-
या सिनेमामुळे जो तोटा झाला तो भरुन काढण्यासाठी अनिल कपूरने नंतर एका पाठोपाठ एक मिळणारे चित्रपट साईन केले होते. बॉलिवूडच्या सर्वात फ्लॉप सिनेमांमधला हा एक सिनेमा ठरला.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल