-
स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा दुसरं पर्व’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सादर होणारे भन्नाट टास्क.
-
अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना भरभरुन हसायला लावण्यात सिद्धार्थचा हातखंड आहे.
-
या कार्यक्रमासाठी सिद्धार्थने केलेल्या लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लेझर सूट परिधान केला आहे.
-
ब्लेझर सूटवर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज परिधान केले आहेत.
-
या फोटोंना सिद्धार्थने ‘Purple Purple Dil Ke Pass’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ जाधव/इन्स्टाग्राम)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?