-
साऊथ इंडस्ट्रीमध्ये ‘मेगा पॉवर स्टार’म्हणून ओळखला जाणारा अभिनेता राम चरण आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
राम चरणने 2007 मध्ये ‘चिरुथा’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
यानंतर राम चरणने तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा ३० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
अभिनेता राम चरण हा चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे राम चरणने दोन नंदी पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.
-
राम चरणचा ‘मगधीरा’ हा चित्रपट जपानमध्ये खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे.
-
‘मगधीरा’ हा चित्रपट पहिल्यांदा 2009 मध्ये तेलुगू भाषेत रिलीज झाला होता परंतु २०१८ मध्ये तो जपानी भाषेत डब केला गेला आणि जपानमध्ये प्रदर्शित झाला.
-
‘मगधीरा’ हा चित्रपट जपानच्या बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा एकमेव भारतीय चित्रपट आहे.
-
राम चरणने 2013 मध्ये ‘जंजीर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट 1973 साली आलेल्या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता.
-
राम चरणचा ‘RRR’ हा चित्रपट त्याच्या करिअरचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. हा चित्रपट आतापर्यंत तिसरा सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे.
-
(सर्व फोटो : राम चरण / इन्स्टाग्राम)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम